यातील धोके स्पष्ट दिसू लागले. या रेट्यामध्ये नवीन पिढी हरवून जाऊ नये, असे सारखे वाटे, तेव्हा आपले वैयक्तिक व सामाजिक जीवन कोणत्या जीवन मूल्यांवर आधारित असावे, हे नव्या पिढीला समजावून सांगण्यासाठी गोष्टी रूपात प्रबोधन असावे व त्या गोष्टीतील पात्रे आपल्याला नक्की कुठे तरी भेटली आहेत, असे वाटावे, हा विचार पक्का करून, कथा लेखन सुरू केले. सहजपणे भारतीय जीवन मूल्यांवर आधारित कथा सूचत गेल्या.
आपली भारतीयांची जीवनमूल्येच शाश्वत आहेत, हे वेगवेगळ्या कथांद्वारे लिहिण्याचा हा प्रयत्न!
या कथा अजून 7-8 वर्षांनंतर येणार्या पिढीला नक्कीच भारतीय जीवन शैली अनुसरायचा विचार करायला लावतील या खात्रीने, त्यांचे भविष्य लक्षात घेऊन माझे विचार त्यांना मार्गदर्शक ठरतील या विश्वासाने.....या कथा नवीन पिढीकरिता!
अनिरूद्ध केळकर
अनिरुद्ध गजानन केळकर, शिक्षण- च उेा, नोकरी- व्यवसायामुळे ठाण्याला स्थायिक. टाटा उद्योग समूह व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अनुभवाचा लाभ घेत पत्नीच्या मदतीने (पत्नीचे शिक्षण - M Com, M Phil), स्वत: च्या अकाऊंट्स Management Consultancy Service providing कंपनी ची स्थापना व त्यात गेले 15 वर्षे कार्यरत. 8-10 mid size कंपनींना सेवा पुरवीत आहोत. आज 40 कर्मचारी कार्यरत.
व्यवसाया सोबतच नागपूरला ग्रामायण प्रतिष्ठान सोबत NGO ला 360 डिग्री mentoring सल्ला व सेवा देण्याच्या उपक्रमात सहभाग. या अभ्युदय उपक्रमास उत्कृष्ट सकारात्मक प्रतिसाद आहे.
कोविड ने खूप समज दिली, खूप शिकवले. बर्यापैकी खोल गटांगळ्या खाल्यानंतर काही लेखन करावे, हा विचार मनात आला व सुरू केले. सहज पणे भारतीय जीवन मूल्यांवर आधारित कथा सुचत गेल्या. काही दीर्घ, लघु तर काही निबंध स्वरूपात लेखन आहे. सर्वस्वी आनंदासाठी हे लेखन आहे व भारतीय जीवन पद्धती व त्यातील मूल्य शाश्वत आहेत, हा दृढ विश्वास असल्याने त्याची मांडणी कथेद्वारे करावी हा विचार..
निवासाचा पत्ता -24, कांचंन गंगा, ओसवाल पार्क, पोखरण रोड -2, ठाणे प.
दूरध्वनी -9769401695
ईमेल - aniruddhagkelkargmail.com
व्यवसाय- www.atharvaaccfin.