कम्युनिकेशनच्या उत्तम पद्धती
मिस-कम्युनिकेशन ते गुड-कम्युनिकेशन
एकदा रस्त्यात दोन मित्रांची भेट झाली. दोघांनाही कमी ऐकायला येत होतं. भेट होताच एकाने विचारलं, ‘‘कुठे चाललायस?’’ यावर दुसर्याने उत्तर दिलं, ‘‘मी मंदिरात जातोय.’’ हे ऐकून पहिला म्हणाला, ‘‘असं होय, मला वाटलं, की तू मंदिरात जात आहेस.’’ यावर दुसर्याने उत्तर दिलं, ‘‘नाही नाही, मी तर मंदिरातच चाललो होतो.’’
हा तर केवळ एक विनोद होता; परंतु कित्येक वेळा आपल्यासोबतही असंच घडतं. आपण बोलतो एक आणि समोरचा समजतो भलतंच.
अशा प्रकारे दैनंदिन जीवनात चुकीचाच संवाद होत राहतो. कारण आपण संभाषणाची एकच पद्धत जाणतो. बालपणापासून ज्या पद्धतीने आपण ऐकत आणि शिकत आलोय, त्याच पद्धतीने संभाषण करत राहतो.
मात्र, आता सुसंवादाच्या विविध पद्धती जाणण्याची वेळ आलीय. कारण तुम्हाला तुमचे भाव आणि विचार व्यक्त करण्यासाठी सर्वांशी संवाद साधावाच लागतो, अन्यथा समोरच्याला तुमचं मनोगत समजणार कसं?
यासाठीच लहानसहान, सहज-सरळ बाबींपासून ते जटिल गोष्टी उत्तम पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रस्तुत पुस्तकात शिका-
- आपले शब्द सकारात्मक पद्धतीने प्रस्तुत कसे करावेत
- कुसंवादामुळे झालेले गैरसमज, उत्कृष्ट पद्धतीने दूर कसे करावेत
- समोरील मनुष्याच्या भावना जाणून घेऊन कसं बोलायला हवं
- एखाद्या गोष्टीसाठी ‘नाही’ कसं म्हणावं
- चर्चेदरम्यान आपल्या मुद्द्यांवर अटळ कसं राहावं
- सरळ परंतु आदरयुक्त संभाषण कसं करावं
तुम्हाला सुसंवादाचे सर्वोच्च आणि विविध पैलू जाणायचे असतील, तर या पुस्तकाचा अवश्य लाभ घ्या, तुमचं संभाषण अधिक प्रभावशाली बनवा.