Diana's search for her twin, Maria, leads her to a magical garden in Istanbul, where she learns the philosophy of roses. At home, by the sea in Rio, she meets the enigmatic artist Matthias, who also challenges her understanding of the world.
An enchanting yet multi-layered tale of chance encounters, magical gardens and vibrant city scapes, The Missing Rose is a profound modern-day fable about the wisdom of the heart. डायनाच्या आईनं जाण्याआधी तिच्याजवळ शेवटची इच्छा व्यक्त केली. तिला दिलेलं पत्र डायनानं ती गेल्यानंतरच वाचावं असं वचन मागितलं. आईच्या निळ्या डोळ्यांतली आर्तता न सोसून डायनानं आईला शब्द दिला.
आई गेली.
आईच्या पत्रानं डायना पुरती हादरली. महिनाभर सैरभैर होती. आईनं त्या पत्रात डायनाला दोन ओळी लिहायला -
संवाद साधायला सांगितलं होतं.
आणि एका रहस्याचा उल्लेख केला होता.
काय होतं त्या पत्रात? आपल्या मरणानंतरच ते पत्र वाचायला का सांगितलं? डायनाला हादरायला का झालं?
असे अनेक गुंते सोडविणारी कादंबरी.
– द मिसिंग रोझ
सरदार ओझकान
सरदार ओझकान यांचा जन्म १९७५साली तुर्कस्तानमध्ये झाला.
रॉबर्ट कॉलेज मधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. लेहाय युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हेनिया,
यू.एस. मधून त्यांनी बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि सायकॉलॉजी या विषयात पदव्या मिळविल्या.
त्यानंतर ते इस्तंबुलच्या बोगाझिसि युनिव्हर्सिटीत सायकॉलॉजीच्या पुढच्या अभ्यासासाठी तुर्कस्तानला परत आले.
२००२ पासून सरदार ओझकान यांनी पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले.
‘द मिसिंग रोझ’ ही त्यांची पहिली कादंबरी ४४ भाषांमधून अनुवादित झाली आहे. जगभरातल्या वाचकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.