Neev Ninety (Marathi): Naitik Mulyanchi Sampatti

· WOW PUBLISHINGS PVT LTD
5,0
3 пікір
Электрондық кітап
224
бет
Рейтингілер мен пікірлер тексерілмеген. Толығырақ

Осы электрондық кітап туралы ақпарат

यशाच्या सर्वोच्च शिखरावर टिकून राहण्याचे रहस्य

जो चारित्र्यवान व पूर्ण बनू इच्छितो, ज्याची विश्र्वकल्याणार्थ मोठे कार्य करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी हे एक सर्वोत्तम पुस्तक आहे. या पुस्तकातून आपणास जे ज्ञान मिळणार आहे ते इतरत्र कोठूनही मिळणार नाही. आजच्या युवा पिढीला या पुस्तकाची नितांत आवश्यकता आहे.

हे पुस्तक म्हणजे जीवन जगण्यासाठी सर्वोच्च मार्ग असून यातून प्रेरणा घेऊन आपण जीवनाचे उद्दिष्ट साध्य करू शकता. ज्या गोष्टींची आपण स्वप्नातही कल्पना केली नसेल, ज्या बाबी अशक्यप्राय वाटत असतील त्या सर्व या पुस्तकाच्या प्रेरणेने प्राप्त करू शकाल.

आजच्या युवापिढीला नवीन दृष्टिकोन देणे व त्यानुसार वाटचाल करण्यासाठी योग्य पद्धत या पुस्तकाद्वारे शिकता येईल. हे पुस्तक असा पुष्पगुच्छ आहे ज्याने स्वत:चे आणि इतरांचे जीवनही सुगंधित व्हावं, प्रफुल्लित व्हावं. याचा सुगंध जर आपल्या, नातेवाईकांच्या, शुभचिंतकांच्या जीवनात दरवळावा असे वाटत असेल तर त्यांना ही चारित्र्यरूपी संपत्ती अवश्य द्या.

ही अनमोल भेट प्रत्येक माता-पित्याने आपल्या तरुण मुलाला द्यावी असंच हे पुस्तक आहे. ज्या गोष्टी आपण आपल्या मुलांना समजावून सांगू इच्छिता, कदाचित तुमचे हे काम या पुस्तकाद्वारे होईल.

Бағалар мен пікірлер

5,0
3 пікір

Авторы туралы

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Осы электрондық кітапты бағалаңыз.

Пікіріңізбен бөлісіңіз.

Ақпаратты оқу

Смартфондар мен планшеттер
Android және iPad/iPhone үшін Google Play Books қолданбасын орнатыңыз. Ол аккаунтпен автоматты түрде синхрондалады және қайда болсаңыз да, онлайн не офлайн режимде оқуға мүмкіндік береді.
Ноутбуктар мен компьютерлер
Google Play дүкенінде сатып алған аудиокітаптарды компьютердің браузерінде тыңдауыңызға болады.
eReader және басқа құрылғылар
Kobo eReader сияқты E-ink технологиясымен жұмыс істейтін құрылғылардан оқу үшін файлды жүктеп, оны құрылғыға жіберу керек. Қолдау көрсетілетін eReader құрылғысына файл жіберу үшін Анықтама орталығының нұсқауларын орындаңыз.