क्रिस्टोफर सी. डॉयल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली असून, कोलकात्याच्या आरआरएममधून बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केला आहे. व्यवस्थापन आणि व्यापार या विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी क्रिस्टोफर यांना आमंत्रित केले जाते. एका अमेरिकन कंपनीच्या भागीदारीत त्यांनी भारतात एका स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सीची स्थापना केली. ते एक मान्यताप्राप्त ‘एक्झिक्युटिव्ह कोच’ म्हणूनही ओळखले जातात.